Established in the year 1999
Telephone - +91 93210 53569 | Email - enquiry@rkcollegeofeducation.com

भांडुप (प) मुंबई येथील सिद्धिविनायक शिक्षण प्रसारक मंडळ संचालित आर के.बी.एड व डी. एड मुंबई विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा कुष्ठरोग निवारण समिती “शांतीवन” नेरे येथे समुदाय सामाजिक कार्यक्रम सप्ताह हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.

या साप्ताहिक उपक्रमात अंधश्रद्धा निर्मूलन सर्व मित्रांचे विविध अनुभव संपूर्ण “शांतीवन” परिसराची ओळख व स्वच्छता मोहीम, कुष्ठरोगी बांधवांची दिनचर्या, त्यांचे कामकाज, स्वावलंबन, तेथे असलेले विविध स्वयं उद्योग, वनीकरण, बागकाम, वृद्धाश्रम, वैद्यकीय सुविधा, रुग्णालय या सर्वच उपक्रमांची विद्यार्थ्यांना शांतीवन आतील उपक्रम प्रमुख श्री. नीलकंठ कोळी सर श्री. परमेश्वर नवले सर यांनी माहिती करून दिली.

महाविद्यालयातील प्राध्यापक श्री. परदेशी सर श्री. तांबे सर यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सात दिवस “शांतीवन” सामाजिक काम केल्यानंतर या कालावधीत विद्यार्थ्यांना “शांतीवन” निर्मितीचा मुख्य उद्देश, समाजाच्या दृष्टीने त्याचे किती महत्त्व आहे व आश्रमात अनेक वर्ष काम करणारे सेवेकरी किती आत्मीयतेने काम करतात ‘मनुष्य सेवा हीच ईश्वर सेवा’ याचा प्रत्यय विद्यार्थ्यांना येथे अनुभवता आला.

सप्ताहात विद्यार्थ्यांनी शांतीवन परिसराची स्वच्छता करताना तेथील प्रत्येक वृक्षाची माहिती करून घेतली पण ज्या दिवशी विद्यार्थ्यांनी राजीव राजन या आधार ग्रहास व वृद्धाश्रमास भेट दिली त्यादिवशी खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांना जीवन व आयुष्याचा अर्थ समजला. तेथे अपघातात अवयव गमावलेले,मानसिक दृष्ट्या व शारीरिक दृष्ट्या विकलांग, कोमात गेलेले अनेक तरुण वृद्ध होते. तेथे सर्व विद्यार्थी गेल्यावर वृद्धांच्या चेहऱ्यावर हसू पाहून विद्यार्थ्यांचे मन हेलावले. त्यांच्या करमणुकीसाठी काही काही सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थ्यांनी सादर केले. त्यांना काही भेटवस्तूही दिल्या. या प्रसंगी सर्वच विद्यार्थी भावुक झाले होते.

बी.एड ची काजल कुमारी ही विद्यार्थिनी म्हणाली की, आज शांतीनातील आश्रमाला भेट दिल्यानंतर खऱ्या अर्थाने आयुष्याचा अर्थ समजला. परमेश्वराने दिलेले सुंदर आयुष्यातील काही क्षण, दिवस येथे येऊन सामाजिक काम केले तर खऱ्या अर्थाने जीवनाचे सार्थक होईल. हि संधी आर. के.बीएड कॉलेज मुळे मिळाली.

बी.एड द्वितीय वर्षाचा रवींद्र अहीरे हा विद्यार्थी म्हणाला की, आम्हाला येथे आल्यानंतर सर्प हा माणसाचा मित्र कसा? वृक्ष संवर्धन कसे करावे? आजारी माणसाची काळजी कशी घ्यावी? व पुढे आयुष्यात शिक्षक म्हणून काम करताना ज्या गोष्टीचे ज्ञान पाहिजे ते ज्ञान आम्हाला येथे मिळाले.आमचे महाविद्यालय सर्वगुण संपन्न शिक्षक घडविण्याचे काम करतात.

बी.एड कॉलेज चे प्राध्यापक श्री. परदेशी सर म्हणाले की, आम्ही दरवर्षी आमच्या बी.एड व डी.एल.एड च्या विद्यार्थ्यांना समाज सेवा व सामाजिक कार्य करण्यासाठी येथे घेऊन येतो. जीवनाचा वेगळा अर्थ येथे आल्यानंतर समजतो यासाठी संस्थेचा संस्थापक संचालक श्री. रमेश खानविलकर सर यांचा नेहमीच आग्रह असतो की माझा प्रत्येक विद्यार्थी, आदर्श शिक्षक झाला पाहिजे पण त्याचबरोबर त्याच्यामध्ये ‘माणुसकी’ निर्माण व्हायला हवी.